नारायणगडच्या पर्यटनाला चालना देणारे भुयार

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र संस्थान नारायणगड परिसरात 2 अद्भुत भुयार आहेत.ज्या भुयाराची लांबी साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर लांब आहे असे अनेक भक्तगण सांगतात.हे भुयार 1990 च्या दशकात सुरु होते.हे भुयार सरळ आहे असे म्हणतात.ॠषीमुनींच्या तपश्चर्या व ध्यानधारणा करण्याचे हे ठिकाण होते.अनेक आख्यायिका या भुयारासंबंधी सांगितल्या जातात.या भुयाराचे खोदकाम करून यातील दगड नारायणगडाचे बांधकाम करण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.या भुयाराला चार रस्ते असण्याची शक्यता आहे.काहीजण या भुयारातून साक्षाळपिंप्री व बेलुरा या गावाकडे जाता येते असे सांगतात.सध्या दोन्ही भुयार बंद आहेत.एक भुयार नारायणगडच्या पश्चिम बाजुला पौंडुळ गावाच्या दिशेला तर दुसरे भुयार नारायणगडच्या उत्तर दिशेला साक्षाळपिंप्री गावाच्या दिशेला आहे.नारायणगडाच्या बाबांचा आतील वाड्याच्या ठिकाणी एक बंद दरवाजा होता असे सांगितले जाते की या दरवाजातून रस्ता भुयारात जातो.

नारायणगडाचे हे ऐतिहासिक भुयार प्रवेशद्वार त्या ठिकाणची माती व दगड काढून एक लोखंडी गेट कुलुप लावुन बसवले तर वन्यप्राणी आतमध्ये जाणार नाहीत.भुयाराची स्वच्छता करून भुयार सर्वांना पाहण्यासाठी खुले केले तर नारायणगडच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल व गडाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.अशा ऐतिहासिक स्थळांमुळे पर्यटक व इतिहासप्रेमी भुगोलाची आवड असणाऱ्या लोकांना निश्चितच भुगर्भाचा अभ्यास करता येईल व बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहिती होतील गरज आहे ती अशा गोष्टींकडे सकारात्मक विचार करण्याची जय नगदनारायण ! जय जिजाऊ जय शिवराय!!

4 thoughts on “नारायणगडच्या पर्यटनाला चालना देणारे भुयार”

Leave a Comment