शाळा पूर्वतयारी मेळावा अंतर्गत माता पालक गृहभेट

शाळापूर्व तयारी अंतर्गत पंचायत समिती बारामती विषय साधन व्यक्ती टिमची कांबळेश्वर येथे माता पालक गट, नवसाक्षर व्यक्ती , CWSN विद्यार्थी माता गटांना गृहभेटी व मार्गदर्शन –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे डाएट पुणे व पंचायत समिती बारामती विषय साधन व्यक्ती टिमने गृहभेटी दिल्या . सदर गृहभेटी मध्ये प्रामुख्याने शाळापूर्व तयारी मेळावा अंतर्गत शाळेने राबवलेल्या मेळाव्याची माहिती गृहभेटी तून माता पालक गटांना विचारण्यात आली . भेटीत दाखलपात्र १० विद्यार्थी व त्यांच्या मातांना भेटी दिल्या . स्मार्ट माता गट २ असून स्मार्ट मातांना whats app ग्रुपच्या माध्यमातून ३ आठवडयाचे आयडिया व्हीडिओ शाळेने ग्रुप वर पाठवल्याचे सांगितले सर्व विद्यार्थांना शाळेतले पाहिले पाऊल या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले असून माता पालक सदर पुस्तिका विद्यार्थ्याकडून सोडवून घेत आहेत . whats app ग्रुपवर पाठवले जाणारे व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे मुलांच्या कडून कृती करून घेत असल्याचे दिसून आले .
पंचायत समिती विषय साधन व्यक्ती गट साधन केंद्र बारामती श्री सागर गायकवाड यांनी मातांना शाळापूर्व तयारी मेळावा, स्मार्ट माता गट, शाळापूर्व तयारी बाबत प्रश्न विचारले त्या स मातांनी छान प्रतिसाद दिली . प्रामुख्याने विद्यार्थी पडताळणी मध्ये विद्यार्थी शरीराचे अवयव, रंगांची नावे ., आकार, चित्रवाचन , फळांची – फुलांची नावे प्राणी पक्षी भाज्या, वहाने, अंकओळख , चित्रे मोजणे कमी जास्त आदी प्रश्नांना विद्यार्थांनी छान प्रतिसाद दिला त्यामुळे शाळेच्या वतीने शाळापूर्व तयारी मेळावा १ चे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे दिसून आले .
श्री सागर गायकवाड यांचे बरोबर कारंडे सर, गायकवाड मॅडम, देवकाते मॅडम, बुरुंगले मॅडम, चव्हाण मॅडम शेळके मॅडम या सर्वांनी भेटीमध्ये माता व विद्यार्थी यांना शाळा पूर्व तयारी मेळाव्या बाबत माहीती घेतली . शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेतील विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या पुस्तिकेवरील प्रश्न विचारले त्यास छान प्रतिसाद मिळाला .
नवसाक्षर भारत प्रभावी अंमलबजावणी अंतर्गत श्री गंगाराम पवार यांची भेट घेतली . श्री सागर गायकवाड यांनी त्यांची मुलाखत घेतली . सदर शासन उपक्रमाचा फायदा कसा झाला वाचन अंक ओळख छान पद्धतीने झाल्याचे पहावयास मिळाले . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील सर्व शिक्षक स्टाफ ने online ॲप वर १६ नवसाक्षर नौंदणी चे काम करून इ ९ वी मधील विद्यार्थी सदर नवसाक्षरांना शिकवण्याचे काम करीत असून नवसाक्षर १६ व्यक्ती ची परीक्षा घेण्यात आली असून १००% नवसाक्षर उत्तीर्ण झाले आहेत .
CWSN अंतर्गत आदर्श अविनाश करपे या विद्यार्थी व माता भेट घेऊन शासन स्तरावरील लाभ मिळाले बाबत माहिती घेण्यात आली .
गावात गृहभेटी दरम्यान चांडाळ चौकडीचे प्रमुख कलाकार भरत शिंदे यांची भेट झाली . त्यांनी चांडाळ चौकडी कलाकारांची मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शिक्षण घेत असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल पालकांच्यात विश्वास निर्माण करण्यात मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते व शिक्षक स्टाफला यश आले असून प्रामाणिकपणे विविध उपक्रम राबवण्यावर शाळा भर देत असल्याचे पटवाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले .
शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे , सौ मनिषा चव्हाण या सर्वांच्या सहकार्याने शाळेत उन्हाळी शिबीर , बाल संस्कार वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, अबॅकस क्लास असे विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जात असून १००% माता पालक गटांचा विद्यार्थी गुणवत्ता वाढीत मोलाचा वाटा असल्याचे दिसून आले खाजगी इंग्रजी माध्यमातून शाळेत दरवर्षी विद्यार्थी दाखल होत असून १००% विद्यार्थी गुणवत्ता वाढ उपक्रम राबविले जात आहेत . या यशस्वी उपक्रम आयोजित करून जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने विषय साधन व्यक्ती टिमने शाळा व माता पालक गटाचे कौतुक केले .

2 thoughts on “शाळा पूर्वतयारी मेळावा अंतर्गत माता पालक गृहभेट”

Leave a Comment