बिंदुसरा धरण भरले Bindusara dharan bharale

बीड जिल्ह्य़ात काल शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण यावर्षी प्रथमच ओसंडून वाहु लागले आहे.रोहतवाडी, सौंदाना, वैद्यकिन्ही, सोनेगाव, सावरगाव, सौंदाना, लिंबागणेश, मांजरसुंबा या घाटावरील गावाच्या परिसरात काल रात्री जोरदार पाऊस कोसळला. यामुळे नदी व नाले तुडुंब भरून वाहत होते. यामुळे बिंदुसरा नदी व धरण खळखळ वाहु लागले. धरणाचे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ बिंदुसरा धरणाकडे … Read more

सतीशकुमार खडके बीडचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महाराष्ट्र शासनाने सतीशकुमार खडकेसाहेब यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केल्याचे पत्र काढले आहे. या पत्रामध्ये त्यांनी त्यांना नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेशित केले आहे. हे पत्र व्ही राधा अप्पर मुख्य सचिव सेवा यांनी काढले आहे. सतीश कुमार खडके … Read more

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची

मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या नीवन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या … Read more

मराठा सेवा संघ बीड जिल्हाध्यक्षपदी धनंजय शेंडगे

बीड शहरातील पोष्ट विभागात कार्यरत असणारे व मुळगाव खापरपांगरीचे धनंजय शेंडगे सर यांची आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक व परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीतील कार्याची दखल घेत मराठा सेवा संघ पश्चिम विभागातील जिल्हाध्यक्षपदी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. काल रविवारी नगर रोड येथील शासकीय विश्रामगृहात मराठा सेवा संघाच्या बीड जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी इतरही निवडी जाहीर करण्यात … Read more

बीडच्या शिक्षक पतसंस्थेला छत्रपती शिवरायांचे नाव

नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी हॉटेल निलकमल बीड येथे सकाळी ठिक 11 वाजता सुरु झाली. सदर बैठकीत सकाळ सत्रात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार मनोगत व गुणवंत विद्यार्थी सन्मानसोहळा पार पडला. यानंतर आलेल्या सर्व सभासद व अतिथी यांनी पतसंस्थेच्या वतीने आयोजित जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे … Read more

महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटनेची आज बैठक

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीड जिल्हा शिलेदारांची 1 नोव्हेंबर, 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी व शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य शासनाकडील इतर मागण्यांबाबत बीड जिल्हा परिषदेसमोर सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. लाक्षणिक उपोषणासंदर्भात नियोजन बैठक आज संध्याकाळी ठिक 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक … Read more

केंद्रीय मुख्याध्यापक महेश मोटे सर जिल्हाध्यक्षपदी

महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्षपदी बीड तालुक्यातील केंद्रीय शाळा रौळसगाव येथील आदर्श व नवोपक्रमशील हुशार व्यक्तिमत्व महेश संभाजीराव मोटे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत निवडीचे पत्र संघटनेचे राज्याध्यक्ष व नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम बहीर सर, सचिन चव्हाण … Read more

पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीमुळे शिक्षकांकडून सन्मानित

बीड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे यांची नुकतीच गडचिरोलीत सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.संजय तुपे हे मुळचे बीड तालुक्यातील मुर्शदपुर गावचे भुमीपुत्र आहेत. 2014 मध्ये महाराष्ट्र दलात त्यांची प्रथम क्रमांकाने पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. मुंबई पोलीस दलातही एकुण 7 वर्षे त्यांनी पुर्ण केली. 2022 साली ते बीड पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत … Read more

दादासाहेब गवते सर सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व

बीड तालुक्यातील नारायणगड परिसरातील दादासाहेब गवते सर एक शांत, अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व आहे.सरांचे मार्गदर्शन विविध शैक्षणिक बाबतीत सदैव मिळते.दादासाहेब गवते सरांचे मुळ गाव बीड तालुक्यातील बेलुरा हे आहे.नारायणगड तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी हे गाव आहे.बेलुरा गावात अनेकजण शिक्षक, प्राध्यापक म्हणून शासकीय सेवेत आहेत. गवते सर आदर्श शिक्षण संस्थेत सेवेत आहेत. गवते सर मोजकेच बोलतात.गवते सर सध्या गीता कन्या … Read more

सतीश वराट सर शिक्षणातील दीपस्तंभ

स्वातंत्र्यपूर्व काळातील मास्तर आणि 21 व्या शतकातील शिक्षक हा दुवा साधत शिक्षण सेवेचा वसा जपणारे सतिश वराट गुरुजी.सतीश वराट सर यांचे ग्रामीण जीवनामधील बालपण आणि तेथील शिक्षण यामुळे ग्रामीण भागातील समस्या अडीअडचणी तसेच ग्रामीण भागातील संस्कृती तसेच शेतकरी कुटुंबातील संपूर्ण जीवन प्रवास यामुळे त्यांचे मन शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनामध्ये जास्त रमते.महाराष्ट्र आणि बीड जिल्ह्यामधील गेवराई … Read more