चौसाळा- प्रत्येक क्षेत्रातील सरावाने आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण बनत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता काम करावे, त्यासाठी पदवीबरोबरच विविध कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन डॉ. विश्वंभर देशमाने यांनी केले. कला व विज्ञान महविद्यालय चौसाळा येथे पदवीदान समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. देशमाने म्हणाले की, कौशल्य विकासासाठी सध्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊनच पुढील शैक्षणिक वाटचाल करावी अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. विलास भिल्लारे म्हणाले की, आपल्या देशाला प्राचीन काळापासून थोर शैक्षणिक परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याला अवगत झालेल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करावा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधाकर वणवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुधीर माने यांनी केले या वेळी बी.एस्सी., बी.ए. व एम. ए. च्या ४८० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत साबळे यांनी केले. या समारंभासाठी प्रा. डॉक्टर संजय कदम, प्रा.डॉक्टर महादेव मुंडे, प्रा. डॉक्टर पंढरीनाथ हिरवे, प्रा. डॉक्टर अमर अलदे, प्रा. डॉक्टर सुदर्शन अवस्थी प्रा. ओम चाळक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

I have been surfing on-line greater than three hours today, but I by no means found any interesting article like yours. It is pretty value enough for me. Personally, if all web owners and bloggers made good content material as you did, the web might be a lot more useful than ever before.