शिक्षक पदोन्नती संघर्ष समन्वय समितीचे 12 मार्च रोजी आमरण उपोषण

  1. शिक्षक पदोन्नती संघर्ष समन्वय समिती बीड जिल्हा परिषद बीड समोर आमरण उपोषण दिनांक 12. 3. 2025 पासून करणार आहे. या उपोषणामध्ये सर्व शिक्षक संघटना बीड जिल्ह्यातील सहभागी होणार आहे. या आमरण उपोषणा संदर्भातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

1) न्यायालीन निर्णय व शासन निर्णयाप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार केंद्रप्रमुख पदोन्नती तात्काळ करा.

2) ग्रेड मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ करा.

3) शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती करा.

( सर्व पदोन्नत्या दिनांक 27 मार्च 2025 पूर्वी करा )

4) निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करा.

5) भविष्य निर्वाह निधी मंजूरी आदेश तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांना अधिकार द्या.

6) 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी जाहिरात असेल तर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावना तात्काळ मंजुरी द्या.

7) आपसात बदलीतील शिक्षकांना ज्युनिअर सेवा जेष्ठता बाबतची संचिका मंजूर करा.

8) 5- 15 वेतनश्रेणीबाबतची संचिका निकाली काढावी.

9) न्यायालयीन आदेशाप्रमाणे प्राथमिक पदवीधर शिक्षकांना प्रापची वेतनश्रेणी लागू करण्याचा आदेश.

10)जि . प .बीड शिक्षण विभाग (प्रा.) यांनी केंद्रप्रमुख पदोन्नती जेष्ठतेने करण्याबाबत लेखी वेळापत्रक दिलेले होते त्यानुसार १५ जुलै २०२४ पर्यंत केंद्रप्रमुख पदोनती होणे आवश्यक होते . जि.प . जुलै 2024 ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत पदोन्नती न केल्या मुळे पदोन्नती पात्र सेवाजेष्ठ ३० शिक्षक पदोन्नती विना सेवा निवृत्त झाले .

तसेच ऑगस्ट २०२४ अखेर पर्यंत मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात येणार होत्या . आतापर्यंत पदोन्नती न झाल्यामुळे पदोन्नती पात्र अनेक शिक्षक पदोन्नती विना सेवानिवृत झाले .
घटनादत्त हक्कापासून शिक्षण विभागाने शिक्षकांना वंचित ठेवले.
ही अतिशय गंभीर बाब असुन शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी बाब आहे . तसेच प्रशासकीय
अधिकाराचा दुरुपयोग करणारी बाब आहे .

वरील विविध मागण्या संदर्भात सर्व शिक्षक संघटना व शिक्षक पदोन्नती संघर्ष समन्वय समिती जिल्हा परिषद बीड समोर आमरण उपोषण करणार आहे.

Leave a Comment