पोळा

महाराष्ट्रात सर्वात उत्साहाने पोळा हा सण साजरा केला जातो. पोळा हा बैलांचा सण असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलाला स्वच्छ धुतले जाते. बैलाच्या शिंगाला रंग दिला जातो. बैलाच्या गळ्यात घागर माळा घातल्या जातात. पोळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बैलाच्या खांद्याला हळद लावली जाते. यालाच खांदा मळणी असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा गोड स्वयंपाक केला जातो. बैलाची गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. पोळ्याच्या आदल्या दिवशी व पोळ्याच्या दिवशी बैलाचा मान असतो. पोळा हा शेतकऱ्यांचा प्रमुख सण आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उत्साहामध्ये बैलपोळा हा सण साजरा केला जातो. हल्ली यांत्रिक पद्धतीने शेती केल्यामुळे बैलांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळे पोळा हा सण उत्साहात साजरा होत आहे. पोळा सणाला काही भागांमध्ये बेंदूर असे म्हणतात. बैलदिवाळी साजरी केली जाते.

Leave a Comment