स्वातंञ्यदिन

दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वातंत्र्यदिन सोहळा गुरुवार 15 ऑगस्ट यादिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली आपला भारत देश होता. महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील,भगतसिंग अशा अनेक महापुरुषांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अतोकाट प्रयत्न केले होते. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा असून त्यामध्ये केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग असून मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. भारतामध्ये विविध जातींचे, विविध भाषा बोलणारे, विविध भूप्रदेशामध्ये वास्तव्य करणारे वेगळेपण आहे. काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो तर काही भाग हा वाळवंटाचा असून काही प्रदेश हा बर्फाळदेखील आहे हेच आपल्या भारतदेशाचे वेगळेपण आहे. अनेक नद्या व पर्वतरांगा आपल्या भारत देशामध्ये आहे. आपल्या भारतीयांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून अनेक उद्योगधंदेही आपल्या भारतामध्ये करतात. स्वातंत्र्य दिनाला आपल्या देशामध्ये प्रमुख कार्यालयामध्ये तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला जातो व मोठ्या उत्साहात आपला स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो.

स्वातंत्र्यदिनादिवशी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या देशाचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. स्वातंत्र्यदिनाला इंग्रजीमध्ये इंडिपेंडन्स डे असे म्हणतात. यादिवशी सर्वत्र भारतामध्ये सार्वजनिक सुट्टी असते. स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारताचा प्रमुख राष्ट्रीय सण आहे. आपल्या भारताचा हा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या भारताला 15 ऑगस्ट, 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा प्रमुख उत्साह सोहळा साजरा केला जातो. आपल्या भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यादिवशी देशाला संबोधित करतात. भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्यदिन हा सुवर्णक्षण आहे. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा .जय हिंद, जय भारत !

1 thought on “स्वातंञ्यदिन”

Leave a Comment