सतीश वराट सर शिक्षणातील दीपस्तंभ

स्वातंत्र्यपूर्व काळातील मास्तर आणि 21 व्या शतकातील शिक्षक हा दुवा साधत शिक्षण सेवेचा वसा जपणारे सतिश वराट गुरुजी.
सतीश वराट सर यांचे ग्रामीण जीवनामधील बालपण आणि तेथील शिक्षण यामुळे ग्रामीण भागातील समस्या अडीअडचणी तसेच ग्रामीण भागातील संस्कृती तसेच शेतकरी कुटुंबातील संपूर्ण जीवन प्रवास यामुळे त्यांचे मन शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनामध्ये जास्त रमते.
महाराष्ट्र आणि बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यातील बऱ्हाणपूर हे त्यांचे जन्मगाव. आई वडिलांना तिन्ही मुलं. सतीश वराट सर तसेच त्यांच्या घरातील सर्वांना बहीण मुलगी हे नातं हवं असं वाटणार म्हणूनच नंतर त्यांना दोन गोड मुली झाल्या. स्त्री पुरुष समानता, बालविवाह प्रतिबंध, स्त्री भ्रूण हत्या विरोधी चळवळ मोहीम राबवणारे, शेतकऱ्यांसाठी, समाजातील गोरगरिबांसाठी तसेच व्यसनाधीनते विरोधात समाज उपयोगी प्रबोधन आणि कामे करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक राज्यस्तरीय प्रशिक्षण घेऊन जिल्हास्तरावर आजपर्यंत दिलेली आहेत. सध्या यशदा मार्फत पंचायतराज संदर्भात भारत देशाचा म्हणजेच ग्रामीण भागाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी केंद्र शासनाने 2030 पर्यंतचे जे शाश्वत विकासाची ध्येय ठरवून दिले आहेत ते पूर्ण करण्यासाठी बीड जिल्ह्यासाठी अंगणवाडी ताई ते ग्रामसेवक सरपंच सर्वांपर्यंत प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा त्यांनाही मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रवीण प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. लॉकडाऊन च्या काळामध्ये तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्या आदेशानुसार छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पोकन चे ऑनलाईन क्लास देत उत्कृष्ट ज्ञानदानाचे काम त्याचबरोबर इंग्रजीची भीती कमी करण्यासाठी अनेक शिक्षकांना सोबत घेत काम केले आहे.
महाराष्ट्राची विस्तार अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष तसेच बीड जिल्ह्याचे तत्कालीन उपशिक्षणाधिकारी प्रवीण कुमार काळम पाटील साहेब यांच्यासोबत महाराष्ट्रात अनेक कार्यशाळा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
बीड जिल्ह्यामधून गेवराई तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सरांची गाढेवाडीची शाळा नावारूपाला आलेली आहे.
आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
पण इथे शेतकरी पुत्र ग्रामीण भागातील संघर्षातून शिक्षण घेत अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्म घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून सन 2009 मध्ये भिवंडी महानगरपालिकेमध्ये नियुक्ती झाली. त्यापूर्वी डीएड साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी या ठिकाणी डीएड पूर्ण केले.
बारावीपर्यंत शिक्षण हे पाडळशिंगी येथे कृषी पंडित भागुजीराव ढेकळे या शाळेमध्ये पूर्ण केले.
या सर्व गोष्टी करत असताना आपसूकपणे माणूस ज्या वातावरणामध्ये राहतो त्याप्रमाणे तिथे तो घडत असतो.
जीवनामध्ये जेवढी वाईट आणि प्रतिकूल परिस्थिती असते त्याविरुद्ध तितकीच क्षमता त्या व्यक्तीमध्ये तयार होत असते. परिस्थिती विरुद्ध दोन हात करण्याची ताकद जिद्द चिकाटी आणि संघर्ष करण्याचा आत्मविश्वास ती परिस्थिती निर्माण करत असते. लहानपणापासूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा काही न्यूनगंडाच्या गोष्टी असतात म्हणून सरांना प्रथमपासूनच आपण इंग्रजी विषयासाठी काहीतरी काम करावे ही एक इच्छा होती त्यामुळे त्यांनी कल्याण येथे इंग्लिश स्पोकन क्लास जॉईन केला. आपली बीड जिल्ह्याला बदली झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण इंग्रजीचे फायदे तसेच इंग्रजी बद्दलचे गैरसमज काढून टाकण्यासाठी मदत करू अशी खूनघाट बांधत 2014 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा वाडी वरती सरांची बदली झाली.
गावातील पुरुष मंडळी मध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त होते तसेच गावातील स्त्रियांमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण जास्त. यामुळे शाळा गळतीचे प्रमाण जास्त तसेच बालविवाह, ऊस तोडी स्थलांतर असे अनेक प्रश्न समोर उपस्थित होते पण जेवढे प्रश्न जास्त तेवढा काम करण्याचा व्याप आणि आवाका जास्त आणि तेवढा जास्त आनंद घेत आनंदाने सर्वांना सोबत घेत प्रश्न कसे हाताळावे कशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे शेतामध्ये आणि घरामध्ये आर्थिक नियोजन तसेच आपल्या मुलाबाळांचं पुढील भविष्य कसे सुरक्षित करायचं यासाठी झाडे लावण्यापासून ते गावातील लग्न कार्य करण्यापर्यंत वराट सरांना बोलावलं जाते.

अनेक कुटुंब व्यसनाधीनते पासून दूर करण्याचे काम काही वेगवेगळ्या कृती उपक्रम आणि प्रबोधनातून केले आहे. अनेक कुटुंब विभक्त होत असताना त्यामधील तंटे आजही गुरुजींच्या हाताने मिटतात.
अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना चांगले सल्ले देण्याचे काम वराट गुरुजी करतात.
प्राचीन काळातील लग्न आणि आजचे लग्न तसेच आज बदलत चाललेला बीड जिल्हा पूर्वीचा बीड जिल्हा याबाबत गावकऱ्यांसोबत गावातल्यांसोबत चर्चा करतात. गावामध्ये बंधारे असतील रस्ते असतील सभामंडप असतील किंवा शाळेचे बांधकाम असेल लोकसहभागामधून अनेक गोष्टी गावासाठी गावाच्या शाळेसाठी केलेल्या आहेत.

शिक्षणाच्या बाबतीत सरांचे स्पष्ट आणि सहज सुलभ अशी काही अनुभव त्यांनी सांगितले.
शिकवण हे तोंडी शिकवण्यापेक्षा कृतीतून दिलेलं शिक्षण खूप प्रभावी आणि दीर्घकाल टिकणारे आहे. थोडक्यात अनुभव हाच गुरु हा सुविचार सरांनी अंगीकारला आहे.
ABL ऍक्टिव्ह बेस लर्निंग नुसार गणितातील तसेच अनेक विषयांमधील आणि कृती करून घेत संकल्पना स्पष्ट आणि दृढ करण्याचे काम हसत खेळत तसेच रचनावादी पद्धतीने केलेले आहे.

21 व्या शतकातील समस्या सोडवण्याची ताकद या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे त्याच प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे.
4C
Communication skill
Critical thinking
Creative thinking
Collaboration.

जगामध्ये कुठेही जा जर हे चार कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये असतील तर तो सर्वांचा लीडर तसेच त्याची कोठेही अडणार नाही हा विश्वास गुरुजी सांगतात. आजपर्यंत घेतलेल्या प्रशिक्षण तसेच अनुभवातून वराट गुरुजी हे सर्व त्यांच्या शाळेमध्ये तसेच त्यांच्या सहकारी मित्रांसोबत या गोष्टी राबवत असतात. फक्त गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर आनंददायी आणि रचनात्मक शिक्षण पद्धती याचा अभ्यास करत तसेच सतत महाराष्ट्रातील तसेच बीड जिल्ह्यातील अनेक गुणवंत शिक्षकांना वराट फॉलो करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या संपर्कात राहून नवनवीन गोष्टी शिकत राहणे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत राहणे तसेच स्वतः ती वाचन करतात. अनेक अनुभव गाठीशी बांधत अश्मयुगीन मानवापासून याच्या आधुनिक मानवा मधील फरक त्याच्या गरजा , त्याच्या भविष्यकालीन समस्या यावर अनेक पुस्तकांमधून लेखांमधून सरांचे वाचन लेखन सुरू असते.

1 thought on “सतीश वराट सर शिक्षणातील दीपस्तंभ”

  1. This so nice, that the people are writting other than political topic. As writter had used so many nice words, so it seems that author knows him very well. but still I think author can make it better.

    Reply

Leave a Comment