सतीशकुमार खडके बीडचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महाराष्ट्र शासनाने सतीशकुमार खडकेसाहेब यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केल्याचे पत्र काढले आहे. या पत्रामध्ये त्यांनी त्यांना नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेशित केले आहे. हे पत्र व्ही राधा अप्पर मुख्य सचिव सेवा यांनी काढले आहे. सतीश कुमार खडके हे 2014 च्या तुकडीचे भारतीय प्रशासन सेवा अधिकारी आहेत. त्यांनी अगोदर महसूल सेवेमधील उपजिल्हाधिकारी संवर्गात कार्य केले आहे. यापूर्वी ते नाशिक जिल्ह्यात सेवेत होते.सतीशकुमार खडके हे एन. एम .आर. डी. ए. च्या महानगर आयुक्तपदी कार्यरत होते. सतीशकुमार खडके सिडकोचे मुख्य जमीन मोजणी अधिकारी म्हणून काही काळ होते . अविनाश पाठक यांच्यानंतर संगितादेवी पाटील यांच्याकडे बीड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार होता.

1 thought on “सतीशकुमार खडके बीडचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी”

Leave a Comment