जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिमाखवाडी या गेवराई तालुक्यातील शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कीर्ती बाळू येवले हिने भारतातील सर्वात मोठ्या रिटेल Store Demart India चे संस्थापक राधाकिशन दमानी फाउंडेशन संचलित सरस्वती विद्या अकादमी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे येथील सीबीएससी मेडीयमच्या इंटरनॅशनल निवासी फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या शाळेत प्रवेश मिळवलेला आहे. या शाळेमध्ये सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत असते. कीर्ती येवले ही ग्रामीण भागातील गरीब घरातून एका कष्टकरी शेतकऱ्याची कन्या आहे. सन 2023 24 मध्ये पहिल्याच प्रयत्नात सरस्वती विद्या अकादमी लोणावळा येथे पाच विद्यार्थी पात्र झालेले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी तयार करणे व त्यासाठी सातत्य ठेवणे ही किमया साधली आहे दिमाखवाडी शाळेच्या ज्ञानेश्वर तळेकर सर यांनी. तळेकर सर यांनी 9 वर्षांमध्ये 56 विद्यार्थी नवोदयपाञ केलेले आहेत. इस्त्रो नासा अमेरिका सहलीसाठी दोन विद्यार्थी, सैनिकी शाळेत अनेक विद्यार्थी तसेच NMMS परीक्षेत 25 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत. पहिल्याच वर्षी कीर्ती येवले ही सरस्वती विद्या अकादमीत पात्र झालेली आहे. दिमाखवाडी शाळेचे पाच विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षा पात्र झालेली आहेत. या सर्व यशामागे सरांचे अथक परिश्रम व कठीण परिस्थिती समोर हार न मानता यशात सातत्य ठेवण्याची त्यांची जिद्द आहे.
तळेकर सरांच्या या यशाबद्दल त्यांचे विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तळेकर सर हे बीड तालुक्यातील नारायणगड परिसरातील केतुरा या गावचे भूमिपुत्र आहेत.
Good congratulations