महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी तुकाराम घिगे सर यांची निवड

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची नुकतीच जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरद जहांगीर केंद्र पारगाव सिरस ता.जि.बीड येथील नवोपक्रमशील व आदर्श शिक्षक श्रीयुत तुकाराम जयराम घिगे सर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राज्य नेते शिवराम घोती सर, राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे सर,राज्य सचिव सचिन चव्हाण सर, राज्य कार्याध्यक्ष युवराज कलशेट्टी,राज्य कोषाध्यक्ष गजानन टांगले, बीड जिल्हाध्यक्ष सचिन पिसाळ, जिल्हा कार्याध्यक्ष मोतीराम आवारे, जिल्हा सरचिटणीस सय्यद कलीम,बीड तालुकाध्यक्ष सखाराम काळे तसेच सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारीवर्ग, विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment