महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीड जिल्हा शिलेदारांची 1 नोव्हेंबर, 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी व शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य शासनाकडील इतर मागण्यांबाबत बीड जिल्हा परिषदेसमोर सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
लाक्षणिक उपोषणासंदर्भात नियोजन बैठक आज संध्याकाळी ठिक 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड येथे आहे तरी सर्व शिलेदारांनी उपस्थित राहावे असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पिसाळ, उपजिल्हाध्यक्ष तुकाराम घिगे, जिल्हाकार्याध्यक्ष मोतीराम आवारे, जिल्हासरचिटणीस सय्यद कलीम बीड तालुकाध्यक्ष सखाराम काळे यांनी आवाहन केले आहे.