नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी हॉटेल निलकमल बीड येथे सकाळी ठिक 11 वाजता सुरु झाली. सदर बैठकीत सकाळ सत्रात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार मनोगत व गुणवंत विद्यार्थी सन्मानसोहळा पार पडला.
यानंतर आलेल्या सर्व सभासद व अतिथी यांनी पतसंस्थेच्या वतीने आयोजित जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे दुसरे सत्र सुरू झाले. सदर सत्रात नितीन भोसले सर यांनी ऐनवेळेस नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे असा विषय मांडला. याविषयाला सचिन पिसाळ सर व मुकुंद रसाळ सर ,सचिन चव्हाण सर ,घोरड सर,वनवे सर,विक्रम राऊत सर, विजयकुमार समुद्रे सर यांनी अनुमोदन दिले.सचिन पिसाळ सर यांनी शिवराय सर्व जातीधर्माचे जगातील एकमेव राजे आहेत हे आपल्या मनोगतात पटवून दिले.
सर्व संचालक मंडळ व उपस्थित सर्व पतसंस्थेच्या सभासदांकडून एकमुखाने छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित बीड असे नामकरण करण्यात यावे हा ठराव मंजूर केला व शिवरायांच्या जयजयकार घोषणा सभागृहात सर्व सभासदांकडून देण्यात आल्या. संजय वाघुले सर यांनी अभ्यासपूर्ण प्रकाश शिवरायांच्या आर्थिक नियोजनावर टाकताना इतिहासातील विविध दाखले आपल्या मनोगतात घाडगे सर व खाडे सर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना सांगितले.
यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभेत इतरही ठराव मंजूर झाले आहेत ते पुढीलप्रमाणे-
- पतसंस्थेचा लाभांश वाटप करणे.
- दिर्घ मुदतीचे कर्ज वाढविणे.
- तातडीचे कर्ज 1 लाख रुपये करणे
पतसंस्थेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवरायांचे नाव बीडच्या शिक्षक पतसंस्थेला दिल्याने सभासदांकडून चेअरमन श्रीराम बहीर सर व सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.