पाऊस Rain

सध्याचे दिवस पावसाचे आहेत. पाऊस हा कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीचा तर कधी वळवाचा असतो.पाऊस तो जास्त प्रमाणात कोसळला तर नुकसानदायक असतो.पाऊस पडला तर जास्त आनंद देतो व दु:ख कमी देतो.महापुर आला तर अनेक गोष्टींचे नुकसान करतो.ओला दुष्काळ असावा पण कोरडा दुष्काळ असु नये असे म्हणतात. नदीला महापुर आला तर तो शेतीचे व घरादाराचे निसर्गाचे नुकसान करतो.पाऊस हा जसा फायद्याचा आहे तसा तोट्याचाही आहे.
पाऊस वेळेवर पडला नाही तर बळीराजा चिंतेत पडतो.आर्थिक नियोजन पावसावरच अवलंबून असते.अनेक उद्योगधंद्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आवश्यक आहे.पाऊस भरपूर पडला तरच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. जनावरांचा चारा,पशुसंवर्धन, सजीवांचे जीवन एकंदर पावसावरच अवलंबून असते.येरे येरे पावसा असे पाऊस एखादवेळेस लांबला तर म्हणण्याची वेळ येते.बारमाही पाऊस पडणारीही जगात काही ठिकाणे आहेत. काही प्रदेशात पाऊस जास्त पडतो .काही प्रदेशात तो मध्यम स्वरुपात पडतो तर काही प्रदेशात तो खूपच जास्त प्रमाणात पडतो.पावसावर अनेक कविता,गाणी,चित्रपट, कथा व लेख प्रकाशित आहेत. चित्रपटातील पाऊस कधी-कधी कृत्रिम असतो.चिंब भिजून जायचे असेल तर पाऊसच हवा.पहिल्या पावसात भिजलेच पाहिजे असे म्हणतात. पाऊस पहिला हा मातीला सुवास देतो.हवेत गारवा निर्माण करतो.उकाड्यातुन हैराण झालेल्या मनाला शितलता देतो.नदीनाले खळखळुन वाहण्यासाठी जोराचाच पाऊस आवश्यक असतो.
दुष्काळग्रस्त भागात पाऊस कमी पडतो पण जर एखादवेळेस तेथे पाऊस जास्त प्रमाणात पडला तर तो तेथील नागरिकांना भरपूर आनंद देतो.
जागतिक तापमानवाढ ही सध्याची जागतिक स्तरावरील समस्या आहे.भरपूर झाडे लावणे व ती जतन करून संवर्धन करणे आजच्या काळाची गरज आहे.औद्योगिकीकरणाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे.सिमेंटची जंगले उभी झाली व पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली.Oxygen चे प्रमाण कमी झाले.वातावरणात उकाडा वाढला आहे.कधी जास्त तर कधी कमी पाऊस पडत आहे.वार्‍याची दिशा बदलत आहे.कोकणात, चेरापुंजी येथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो.शाळेभोवती तळे साचून सुट्टी हवी असेल तर पाऊसच पडावा लागतो.पावसाने अनेक संसार व गावेही उद्ध्वस्त केलेली आहेत. डोंगराच्या कडा व दरडी ,पुल जोराच्या पावसानेच कोसळतात.
रिमझिम गिरे सावन ,बरसात के दिन आए Rain Rain come again अशा कविता,गाणी फक्त पावसातच सुचतात. मानवी नातेसंबंधदेखील पावसावरच अवलंबून असतात. पाऊस वेळेवर पडला नाहीतर व्यवहार ठप्प होतात. आर्थिक उलाढाल बंद होते.बांधकाम व्यावसायिक, शेती,उद्योगधंद्यात कार्यरत कामगारांना पाऊस पडला नाहीतर आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते.वीजनिर्मितीही पावसावरच अवलंबून आहे.अनेक सणांचा आनंद पावसावरच आधारित असतो.शेतकऱ्यांचा सण बैलपोळा पाऊस पडला तरच आनंदात साजरा होतो.यामुळेच पाऊस हा हवाच येरे येरे पावसा तुला देतो पैसा..पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा !!!

Leave a Comment