बीड तालुक्यातील नारायणगड परिसरातील दादासाहेब गवते सर एक शांत, अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व आहे.सरांचे मार्गदर्शन विविध शैक्षणिक बाबतीत सदैव मिळते.दादासाहेब गवते सरांचे मुळ गाव बीड तालुक्यातील बेलुरा हे आहे.नारायणगड तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी हे गाव आहे.बेलुरा गावात अनेकजण शिक्षक, प्राध्यापक म्हणून शासकीय सेवेत आहेत. गवते सर आदर्श शिक्षण संस्थेत सेवेत आहेत. गवते सर मोजकेच बोलतात.गवते सर सध्या गीता कन्या विद्यालयात आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
गवते सर एक संयमी व्यक्तिमत्व आहे.मराठा आरक्षणप्रश्नी त्यांनी स्वखर्चातुन मराठा समाजाकडून 1000 form भरुन घेतले आहेत. मराठा समाजासाठी व सामाजिक कार्यासाठी मेहनत करणारे गवते सर एक अनुभवी शिक्षक आहेत.
गवते सर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलुरा येथे झाले आहे.गवते सरांचे माध्यमिक शिक्षण श्री नगदनारायण विद्यालय नारायणगड येथे झाले आहे.त्यानंतर 11 वी 12 वी कला शाखेत गजानन विद्यालय राजुरी (न.) येथे पुर्ण केले. बी. ए.चे शिक्षण नवगण college बीड येथे तर बी. एड.दयानंद college सोलापूर येथे पुर्ण झाले.
26 ऑक्टोबर, 2004 पासून ज्या शाळेत सर शिकले त्या शाळेत अध्यापन करण्यासाठी गजानन विद्यालय राजुरी न.येथे सेवेत रुजु झाले. 2004 ते 2013 पर्यंत राजुरी न. येथे गवते सर कार्यरत होते. त्यानंतर 2013 ते 2017 पर्यंत आर्वी हायस्कूल आर्वी तालुका शिरुर कासार येथे सर होते. यानंतर गवते सर 2017 ते आजतागायत गीता कन्या प्रशाला बीड फक्त मुलींची शाळा येथे अध्यापन करत आहेत.
दादासाहेब गवते सर यांचा जन्म 13 ऑगस्ट, 1979 यादिवशी झाला. गवते सर यांचे कुटुंब आजही एकत्र आहे.गवत सर यांना दोन भाऊ आहेत. कुटुंबात एकुण 13 सदस्य आहेत. सरांच्या मोठ्या भावाचे 2 मुले पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. सरांच्या छोट्या बंधुला एक मुलगा व एक मुलगी आहेत.
गवते सर गावातील सामाजिक, शैक्षणिक व व्यसनमुक्तीवर सतत कार्यरत असतात. गवते सर पुरोगामी विचारसरणीचे आहेत. शिवराय, शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा सरांच्या जीवनावर प्रभाव आहे.आदरणीय गवते सर यांना दीर्घायुष्य लाभो हीच बिंदुसरा एज्युकेशन डॉट कॉम या शैक्षणिक वेबसाइट व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीड जिल्हा यांच्या वतीने शुभेच्छा.
Best regards gavate sir