आज 10 मार्च 2025 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे त्यांना विनम्र असे अभिवादन. क्रांतीज्योती सावित्रीबाई या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पत्नी होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला होता. त्यांनी मुलींना शिकवले होते. यासाठी त्यांनी अनेक अपमान सहन केले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना त्यांनी खंबीर साथ दिली. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. स्त्री शिक्षणाचा उद्धार त्यांनी केला. त्यांच्यामुळेच आज अनेक स्त्रिया नोकरीला आहेत व राजकीय क्षेत्रामध्ये मानाचे स्थान भूषवत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अनमोल अशा कार्याला विनम्र असे अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा. सावित्रीबाई फुले या समाज सुधारक होत्या. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी लोकांचे दगड गोटे शेण हाल अपेष्टा सहन केल्या. त्या स्फूर्तीनाईका आहेत. त्यांनी स्त्रियांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत पेटवली. त्यांनी चूल आणि मुल या पारंपरिक बंधनातून मुलींना शिक्षणाकडे वळवले.