अमोल जरांगे सर पेन्शन संघटनेच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी मातोरी गावचे भूमिपुत्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरंगळवाडी नंबर 2 केंद्र-तिंतरवणी तालुका शिरूर जिल्हा बीड येथील आदर्श शिक्षक व उत्कृष्ट संघटक अमोल बाबासाहेब जरांगे सर यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे राज्य नेते शिवराम घोती सर, राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे सर,राज्य कोषाध्यक्ष गजानन टांगले सर, राज्य सरचिटणीस सचिनकुमार चव्हाण सर तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन पिसाळ सर, जिल्हाउपाध्यक्ष तुकाराम घिगे सर, जिल्हा कार्याध्यक्ष मोतीराम आवारे सर, जिल्हा सरचिटणीस सय्यद कलीम सर, जिल्हा प्रवक्ता ज्ञानेश्वर कोटुळे सर, बीड तालुकाध्यक्ष सखाराम काळे सर, गेवराई तालुकाध्यक्ष रवींद्र शेळके सर तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी व अधिकारी वर्गाकडून अमोल जरांगे सर यांच्यावर शुभेच्छांचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अमोल जरांगे सर यांच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी निवडीने शिरूर तालुक्यातील पेन्शन शिलेदारांमध्ये व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leave a Comment