मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा बीड येथे मेळावा

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 28 मार्च 2025 यादिवशी आशीर्वाद लॉन्स बीड येथे संध्याकाळी ठीक सहा वाजता मराठा शिक्षक कर्मचारी यांचा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यास मनोज जरांगे पाटील प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते शिक्षकांचे विविध प्रश्न व छत्रपती शिवरायांचा अभ्यासक्रमातील इतिहास समावेशाबाबत संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास सर्वांनी सहकुटुंब यावे यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून या बैठकीत विविध विषयावर मनोज जरांगे पाटील सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांचे लक्ष मनोज जरांगे पाटील या मेळाव्यात काय बोलणार याकडे लागले आहे.

1 thought on “मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा बीड येथे मेळावा”

Leave a Comment