IPS बिरदेव ढोणे

एका सामान्य मेंढपाळचा मुलगा IPS अधिकारी होणे सोपी गोष्ट नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बिरदेव लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. कठीण परिश्रम करत त्याने हे यश संपादन केले आहे.यामागे त्याची जिद्द व चिकाटी निश्चित आहे. बिरदेव ढोणे यांनी आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या होत्या. अनेक परीक्षात अपयश आल्यानंतर त्याने या यशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील तो पहिला आयपीएस अधिकारी आहे. धनगर समाजातील मेंढपाळाचा बिरदेव ढोणे यांनी कोल्हापूरचा झेंडा भारताच्या नकाशावर फडकवला आहे. आज ही तो मामाच्या गावी पालावर सध्या राहत आहे. त्याचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी केलेले दुर्लक्ष त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. पोलीस अशा बाबतीत गांभीर्य ठेवत नव्हते ही बाब बिरदेव ढोणे यांना खटकली त्यांनी ती आपल्या मुलाखतीत सांगितली आहे. निश्चितच आयपीएस अधिकारी म्हणून सेवा करताना ते आपले कार्य प्रामाणिकपणे बजावतील आणि देशाची मान त्यांच्या सेवेमुळे निश्चितच उंचावली जाईल. यूपीएससी एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रिदेव ढोणे यांचा जीवनप्रवास निश्चितच प्रेरणादायी राहील. बीडच्या मयूर झोडगे या मित्राने त्याला केलेली मदत त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितली आहे. बिरदेव ढोणे पुढील परीक्षेची तयारी करण्यासाठी काही काळ दिल्ली येथे classes जॉईन करण्यासाठी गेला होता.

आपल्या मुलाखतीत बिरदेव ढोणेने दुधासंबंधी अधिक माहिती सांगितली आहे. मेंढ्यासंबंधीचा व दुधाचा अभ्यास त्याचा चांगला आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पण सर्वजण त्यामध्ये यशस्वी होतात असे नाही. यश मिळवण्यासाठी त्यांना यश अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. कधी कधी खडतर परिश्रम करूनही यश हुलकावणी देते.बिरदेव ढोणेनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना सर्व मित्रांनी केलेली मदत सांगितली आहे. अनेक शिक्षक लोकांनीही बिरदेव ढोणेला मार्गदर्शन केले आहे. अनेक नातेवाईकांनी ही त्याला शिक्षणासाठी मदत केली आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे. आज बिरदेव ढोणे स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे यामागे सर्वांचे सहकार्य आहे हे बिरदेवने सांगितले आहे.

Leave a Comment