IPS बिरदेव ढोणे

एका सामान्य मेंढपाळचा मुलगा IPS अधिकारी होणे सोपी गोष्ट नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बिरदेव लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. कठीण परिश्रम करत त्याने हे यश संपादन केले आहे.यामागे त्याची जिद्द व चिकाटी निश्चित आहे. बिरदेव ढोणे यांनी आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या होत्या. अनेक परीक्षात अपयश आल्यानंतर त्याने या यशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल … Read more

पहलगाम

काल दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकावर केलेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. हा दहशतवादी हल्ला अतिशय भ्याड होता. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांना टार्गेट केले. एकाही महिलेवर त्यांनी गोळी झाडली नाही. भारत देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा हल्ला आहे. उन्हाळा असल्याने पर्यटकांची गर्दी जम्मू कश्मीर श्रीनगर या ठिकाणी झाली होती. याचा विपरीत परिणाम भारताच्या पर्यटनावरही होणार आहे. … Read more

बीडला आज रेल्वे धावली

बीड ते वडवणी अशी रेल्वे trial आज घेण्यात आली. आज दिनांक 21 मे 2025 वार सोमवार रोजी बीड ते वडवणी ट्रायल रेल्वे रुळावरून धावली. बीडकरांच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. आता प्रतीक्षा आहे बीड करांना बीड ते मुंबई रेल्वे धावण्याची. लवकरच तोही सुवर्णक्षण येईल अशी आशा करूया. भविष्यात परीक्षेमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज … Read more

जयभीम महोत्सव बीड

बीडमध्ये जय भीम महोत्सव शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर यांच्यामार्फत जयभीम महोत्सव चार एप्रिल ते १४ एप्रिल या तारखेत विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा केला जाणार आहे. यामध्ये लढाबा भिमाचा संगीत रजनी कार्यक्रम, भीम गीत गायन स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा, … Read more

कांबळेश्वर शाळेचा आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रम जल्लोषात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – *स्वर्गीय अशोक काका देशमुख व स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे आज स्व.धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्टतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्या वाटप – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आनंद बाजार व खाऊ … Read more

शिक्षक प्राध्यापक मेळाव्यामुळे बीडमध्ये दिवाळीमय वातावरण

बीडमध्ये उद्या संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद लॉन्स बार्शी रोड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डॉक्टर वकील केमिस्ट व व्यापारी बांधव सर्व कर्मचारी यांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा ही प्रमुख मागणी राज्य सरकारकडे या मेळाव्यातून … Read more

जरांगे पाटील उद्या संध्याकाळी शिक्षक, प्राध्यापक मेळाव्यासाठी बीडमध्ये

बीडमध्ये होणाऱ्या मनोज जरांगे पाटलाच्या मेळाव्याला, शिक्षक, प्राध्यापक, बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…… चौसाळा, प्रतिनिधी दिनांक 28,, 3,, 2025. शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय बीड येथे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित होणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर वकील, इंजिनियर, व विद्यार्थी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बीड … Read more

विद्यार्थ्यांनी पदवी बरोबरच विविध कौशल्य विकसित करावी डॉक्टर विश्वंभर देशमाने

चौसाळा- प्रत्येक क्षेत्रातील सरावाने आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण बनत  असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता काम करावे, त्यासाठी पदवीबरोबरच विविध कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन डॉ. विश्वंभर देशमाने यांनी केले. कला व विज्ञान महविद्यालय चौसाळा येथे पदवीदान  समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. देशमाने म्हणाले की, कौशल्य … Read more

बीड येथे 28 मार्च रोजी मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत शिक्षक मेळावा

मराठा प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटन बीड जिल्हा मेळावा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 28 मार्च, 2025 वार – शुक्रवार रोजी वेळ सायंकाळी ठीक सहा वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय सोमेश्वर मंदिराजवळ बार्शी रोड बीड याठिकाणी संपन्न होणार आहे. या मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य  इतिहास डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची विकासाकडे वाटचाल होण्यासाठी समाजातील … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा बीड येथे मेळावा

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 28 मार्च 2025 यादिवशी आशीर्वाद लॉन्स बीड येथे संध्याकाळी ठीक सहा वाजता मराठा शिक्षक कर्मचारी यांचा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यास मनोज जरांगे पाटील प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते शिक्षकांचे विविध प्रश्न व छत्रपती शिवरायांचा अभ्यासक्रमातील इतिहास समावेशाबाबत संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास सर्वांनी सहकुटुंब … Read more