जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे प्रवेशोस्तव जल्लोषात संपन्न – शाळेमध्ये १२५ प्रवेश पूर्ण – पहिल्याच दिवशी शाळेने लावला हाऊसफुल्ल चा बोर्ड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शैक्षणिक वर्ष 2025 26 अंतर्गत शाळेमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या इयत्ता पहिली मधील ३५ तसेच इयत्ता दुसरी ते चौथी मध्ये दाखल होणाऱ्या १५विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला . सकाळी आठपासूनच शाळेमध्ये पालक ,ग्रामस्थ, पदाधिकारी शिक्षक यांची लगबग सुरू होती .जणूकाही लगीनगाही ची गडबड असते त्याप्रमाणे शाळेच्या मैदानावर घोडा ,बैलगाडी, ट्रॅक्टर, कलानंद साऊंड सिस्टिम, लेझीम पथक, ताशे, हलगी, आदीची गडबड मैदानावर सुरू होती .बरोबर नऊ नंतर हळूहळू विद्यार्थी ,पालक वर्ग मैदानावर जमायला लागले.फेटे घातलेले विद्यार्थी नवीन कपड्यांमध्ये आलेले विद्यार्थी येत होते . शाळेतील सर्व विद्यार्थी पालक मैदानावरील लगबग पाहून भारावून गेले हळूहळू खुंटे, शिंदेवाडी, येळे काळे वस्ती, लाटे, सांगवी,हनुमान नगर शिंदेवाडी आधी भागातील पालक विद्यार्थी प्रवेशासाठी शाळेमध्ये आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना नवीन ठिकाणी कामेल का ही मनातील शंका परंतु शाळेतील मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, सौं .सुनिता शिंदे सौ मनीषा चव्हाण शिक्षकांची विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ, आत्मीयता पाहून पालक वर्ग भारावून गेला . थोड्याच वेळामध्ये विद्यार्थ्यांची मिरवणूक गावांमधून सुरू झाली . सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सर्व सन्माननीय सदस्य ,संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी सर्व सदस्य, पदाधिकारी ,सर्व माजी विद्यार्थी, चांडाळ चौकडीचे कलाकार या सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थी मिरवणुकीला प्रारंभ झाला . प्रामुख्याने प्रवेश पात्र विद्यार्थी घोड्यावरून मिरवणूक ट्रॅक्टर मध्ये सजवलेल्या फेटे बांधून बसलेले विद्यार्थी बैलगाडीमध्ये सजवलेल्या गाडीत विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांनाही गाडीत बसण्याचा मोह आवरला नाही .शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक गेले महिनाभर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधून चालू वर्षापासून सीबीएससीचे शिक्षण सुरू होत असून पालक वर्गामध्ये जिल्हा परिषद शाळा दर्जा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यामध्ये यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले . 100% विद्यार्थ्यांचे औक्षण मिरवणुकीमध्ये घरोघरी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पालक वर्ग करत होता . शाळा प्रति विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी 2018 पासून सातत्याने प्रबोधन करून इंग्रजी खाजगी माध्यमातून 150 पेक्षा जास्त विद्यार्थी मातृभाषेमध्ये खेचून आणण्यात यश मिळवले आहे . आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्याचे काम सातत्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मंथन, आयटीएस ,एमटीएस, ओलंपियाड ,श्रेयशी अनेक खाजगी परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची भविष्यकालीन शिष्यवृत्ती ,जवाहर नवोदय, सैनिक स्कूल नीट , जेईई अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे काम पालक वर्गाच्या सहकार्यांमधून होत असताना दिसून येत आहे .याचाच परिपाक म्हणून आज पहिल्याच दिवशी शाळेमध्ये 125 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण क्षमतेने भरले असून पहिल्याच दिवशी शाळेने हाउसफुल चा बोर्ड लावला असून विद्यार्थ्याप्रती विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट वर्षभर घेतले जाणारे विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, ॲबॅकस , कब बुलबुल, श्रमदान, बालसंस्कार वर्ग, योगासने ,लुप्त चालत असलेले खेळ ,पोहणे ,विटी दांडू, लगोर, मल्लखांब ,कुस्ती, गोट्या खेळणे, टायर फिरवणे असा विविध खेळाच्या माध्यमातून जुनी संस्कृती टिकवून ठेवण्याचा मानस आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर हसत खेळत शिक्षण देण्याचं उद्दिष्ट पहिल्याच दिवशी शाळा शुभारंभ निमित्त वर्षभर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी समस्त पालक वर्गाला संबोधित केले आपण ज्या विश्वासाने जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले या प्रवेशामधून निश्चित भविष्यामध्ये आपले विद्यार्थी 100% खाजगी इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत . असा शब्द पालक वर्गाला देण्यात आला .
शाळेच्या शुभारंभ दिनानिमित्त जिव्हाळा मित्र ग्रुप- माजी विद्याथी परिवारा मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांचे टी-शर्ट देण्याची घोषणा व आठवडा भरात पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले .त्याचबरोबर बबलू भैया देशमुख यांचे कडून नऊ हजार रुपये दप्तरे, चार हजार रुपयांच्या वह्या तुषार खलाटे यांनी उपलब्ध करून दिल्या .,धनंजय खलाटे यांचे कडून सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार रुपयाची अंकलीपी, कलानंद साऊंड सिस्टीम यांनी विद्यार्थ्यांचा पहिलाच दिवस डीजे लावून आनंदोत्सव साजरा करण्यामध्ये सहकार्य केले . संभाजी खलाटे यांनी अडीच हजार रुपये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य साठी व मिरवणुकीत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला . त्याचबरोबर पोलीस पाटील श्री . रणजीत रावते यांनी विद्यार्थ्यांना मिरवणुकीमध्ये घोडा उपलब्ध करून दिला .सुजल झेरॉक्स सांगवी सौ .रूपाली सस्ते यांच्यामार्फत शाळेमधील सर्व प्रवेश पात्र मुलींचे सुकन्या समृद्धी खाते काढण्यासाठी प्रत्येक खात्याला अडीचशे रुपये याप्रमाणे सर्व मुलींची सामाजिक भावनेतून खाते काढून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला . त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी रामराजे वाघमारे यांनी सर्व मुलांना अक्षर लेखन पुस्तिका साठी तीन हजार रुपये त्याचबरोबर सरपंच मंदाकिनी व सर्व सन्माननीय सदस्य यांचेकडून २५०० रु मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात आले .प्रामुख्याने विद्यार्थ्यांना बैलगाडीची सफर वैभव गायकवाड यांच्यामार्फत संपूर्ण गावामध्ये फेरी करण्यात आली सदर प्रसंगी सर्व ग्रामस्थ पालक पदाधिकारी यांनी संपूर्ण गावामध्ये विद्यार्थ्यांना फेरीमध्ये स्वतः सहभागी होऊन शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तक वाटप ,मोफत वह्या वाटप ‘मोफत बुट सॉक्स वाटप, विद्यार्थ्यांना खाऊ चॉकलेट जिलेबी देऊन विद्यार्थ्यांना पहिला दिवस अतिशय छान पद्धतीने पालक शिक्षक ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या सहकार्यातून संपन्न झाला .
शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या जोशपूर्ण प्रवेशोस्तव व पालक सहभागातून १०० जिल्हा परिषद शाळांतील दर्जेदार शिक्षणाचा प्रचार , प्रसार मधून पालक वर्गात विश्वासार्हता टिकवून जिल्हा परिषद शाळांचे पट कमी होत असताना मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते व शिक्षक स्टाफने पट वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ची तळमळ यशस्वी पणे राबविले बद्दल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री निलेश गवळी साहेब विस्तार अधिकारी श्री संजय जाधव साहेब केंद्रप्रमुख श्री संतोष खलाटे यांनी कौतुक केले .
। ध्यास विद्यार्थी विकास । विद्यार्थी तुमचे गुणवत्ता आमची ।
श्री .ज्ञानदेव सस्ते
मुख्याध्यापक शाळा कांबळेश्वर
