मित्रांनो तुम्हाला युट्युब चॅनेल शिकायचे आहे. या यूट्यूब चैनल मधून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. पैसे कमवून तुम्हाला युट्युब चॅनेल मधून करिअर घडवायचे आहे. हे सध्या शक्य आहे का? हल्ली तर भारताच्या प्रत्येक गावामध्ये दोन-तीन जनाचे युट्युब चॅनेल म्हणजे युट्युबर तुम्हाला दिसत आहेत. Youtube Channel earning तुम्हाला चांगल्या प्रकारे देऊ शकते का? यासंबंधी माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो युट्युब चॅनेलचे विविध प्रकार आहेत. यातील एक प्रकार निवडून तुम्हाला युट्युब चॅनेल सुरू करावे लागेल. कोणताही एक प्रकार निवडला नाही तर युट्युब तुमच्या चॅनलला प्रमोट करू शकत नाही. कोणता तरी एक विषय निवडा व त्यावर त्या संबंधित व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. सुरुवातीला त्यावर तुम्हाला कमी व्ह्यूज येतील. पण कालांतराने हळूहळू व्ह्यूज वाढत जातील . Youtube चैनल वर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला विविध ॲप्सची मदत घ्यावी लागेल. तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमले पाहिजे. चांगल्या प्रकारचे आकर्षक थंबनेल्स यासाठी तुम्हाला बनवता आले पाहिजे. व्हिडिओ मधील तुमचा आवाज हा उच्च दर्जाचा असावा. तुम्ही जो विषय निवडला आहे तो अधिक मनोरंजक असावा. तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशा प्रकारचा असावा. तुमच्या व्हिडिओतील डिस्क्रिप्शन व्यवस्थित असावे. तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ संबंधित टॅग तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जोडता आले पाहिजे. तुमच्या व्हिडिओचे प्रोफाइल logo आणि बॅकग्राऊंड बॅनर चांगल्या प्रकारचे असावे. तुमच्या यूट्यूब चैनल ची माहिती तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये चांगल्या प्रकारे दिली पाहिजे. तुमचे चैनल कशा संबंधित आहेत याविषयी त्यामध्ये सविस्तर वर्णन असावे.
Youtube चैनल वर तुम्हाला दररोज सतत नवनवीन अपडेट्स देता आले पाहिजे. यूट्यूब चैनलवर तुम्हाला दररोज व्हिडिओ अपलोड करावे लागतील. यासाठी तुम्ही सक्सेस युट्युबरचे व्हिडिओ बघू शकतात. तुमच्या व्हिडिओचे सबस्क्राईब वाढवण्यासाठी तुमचे व्हिडिओ व्हायरल होणे आवश्यक आहे. युट्युब व्हिडिओ हे long व्हिडीओ व short व्हिडीओ या दोन प्रकारांमध्ये असतात. ज्या दिवशी तुम्ही काही कारणामुळे व्हिडिओ बनवू शकत नाही त्या दिवशी तुम्ही काही माहिती देणारे फोटो किंवा पोस्ट लिहू शकतात.
एखाद्याने त्याचे Youtube app त्याच्या मोबाईल मध्ये उघडल्यानंतर तुमचा व्हिडिओ त्याच्या युट्युब ॲप वर टॉपवर दिसण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. यालाच रँकिंग म्हणतात. यूट्यूब चैनल व्हायरल करण्यासाठी विविध सोशल मीडिया ॲपची तुम्ही मदत घेऊ शकता. यामध्ये Twitter, Instagram, threads, Facebook whatsapp अशा सोशल मीडिया ॲप्स तुम्ही उपयोग करू शकतात. विविध व्यक्तींच्या तुम्ही मुलाखती youtube चैनल वर घेऊ शकतात. तुम्ही कोणकोणते छान पदार्थ बनवतात तेही तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वर सांगू शकतात. निसर्ग, पर्यावरण, हवामान,शैक्षणिक घडामोडी बातम्या अशा विविध विषयावर तुम्ही यूट्यूब चैनल बनवून त्यावर संबंधित विषयाचे व्हिडिओ अपलोड करू शकतात.
youtube चैनल हे पैसा कमवण्याचे साधन नक्की आहे. पण तुम्हाला त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. तुमचे व्हिडिओ परदेशात मध्येही बघितले जावे यासाठी तुम्ही तेथील दैनंदिन घडामोडी व विषयांचा अभ्यास करून त्या संबंधित व्हिडिओ बनवू शकतात. इंग्रजी ही जागतिक दर्जाची भाषा आहे. तुम्ही युट्युब व्हिडिओ इंग्रजीमध्ये बनवले तर ते अधिक रँक होऊ शकतात. Youtube चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्ही विविध साधनांचा उपयोग ही करू शकतात. तुमच्या मोबाईलचा कॅमेरा हा उत्तम दर्जाचा हवा. तुमचा आवाज उत्तम दर्जाचा असावा यासाठी तुम्ही माईक ही खरेदी करू शकतात. तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या बॅकग्राऊंडला लाईट ही व्यवस्थित हवी यासाठी किंवा बॅकग्राऊंड पडदा chroma चा खरेदी करू शकतात. तुमचे व्हिडिओ कॉलिटी दर्जाचे बनवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हिडिओची उत्सुकता नक्की वाढवा. दोन गोष्टी मधील तुलना किंवा how to असे question type टायटल देऊन त्या संबंधित तुम्ही व्हिडिओ बनवून तुमच्या व्हिव्हर्स ना व्हिडिओ शेवटपर्यंत बनवण्यासाठी भाग पाडू शकतात.
टेक्निकल व फायनान्शिअल व्हिडिओ यामध्ये तुमचे रिव्हेन्यू जास्त प्रमाणामध्ये बनतात. तसेच शैक्षणिक व्हिडिओमध्ये ही तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतात. आर्थिक बाबतीत सल्ला देणारे किंवा आर्थिक बाबतीत माहिती देणारे व्हिडिओ बनवून तुम्ही चांगल्या प्रकारे रनिंग करू शकता. तुम्हाला व्हिडिओ मिक्सिंग ही चांगल्या प्रकारे जमली पाहिजे. तुमच्या व्हिडिओला तुम्ही विविध चांगल्या प्रकारचे ॲनिमेशन्स, स्टिकर्स वापरले पाहिजे. तुम्हाला चांगल्या प्रतीचा थंबनेल बनवता आला पाहिजे. youtube चैनल वर अर्निंग करण्यासाठी तुम्हाला वरील सर्व गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ एडिटिंग शिकले पाहिजे. तसेच तुम्हाला ग्राफिक डिझाईन ही आले तर खूपच छान. तुम्हाला जे युट्युब चॅनेल बनवायचे आहे तुम्ही जे तुमच्या यूट्यूब चैनल ला नाव दिले आहे. त्या नावाचा जो विषय तुम्ही निवडला आहे त्या विषयावर तुमचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. दर्शकांना एंगेज ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ देता आले पाहिजे. रंजकता वाढवण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे शब्दसाठा ही भरपूर असावा यासाठी तुमचे वाचन असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीसाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असावा. तुमच्या youtube चैनलचे नाव शक्यतो चार-पाच शब्दांमध्येच असावे. आजच्या लेखांमध्ये मी तुम्हाला यूट्यूब चैनल मध्ये अर्निंग करण्यासाठी किंवा त्यामध्ये करिअर करण्यासाठी या टिप्स देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला या टिप्स नक्कीच आवडतील व आपण त्या टिप्स follow करताल अशी आशा बाळगतो.Youtube is best social media for money earning.