केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण येळंबघाट शाळेत संपन्न

बीड तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा येळंबघाट येथे गुरुवारी दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी शाळा तयारी अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत मधुकर तोडकर साहेब व केंद्रप्रमुख श्रीयुत खंदारे साहेब यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

कार्यक्रमाची रूपरेषा श्रीयुत बारगजे सर यांनी स्पष्ट केली. या प्रशिक्षणासाठी केंद्रातील शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्रीयुत वंजारे सर व मस्के सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विकास पत्रातील शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनात्मक व भाषा विकास तसेच गणपुर व तयारी यासंदर्भात करावयाची तयारी याबाबत या तज्ञ मार्गदर्शकांनी सविस्तर विश्लेषण केले. माननीय तोडकर साहेब यांनी केंद्रातील सर्व शाळांचा मेळावा यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटकाबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांनी स्टॉलची मांडणी व त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सेल्फी पॉईंट याबाबत सविस्तर माहिती दिली. या केंद्रस्तरीय प्रशिक्षणामध्ये केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच अंगणवाडी ताई उपस्थित होत्या. सदर प्रशिक्षण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

5 thoughts on “केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण येळंबघाट शाळेत संपन्न”

Leave a comment