मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मंगळवार दिनांक 16 एप्रिल, 2024 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त ते बीड जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देणार असून पारगाव घुमरा येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाची ते सांत्वन भेट घेणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेटी देणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता सुरू होणारा त्यांचा दौरा रात्री आठ वाजता संपेल. मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील समनापुर, वाढवणा पिंपळगाव, मानेवाडी ,महाजनवाडी, वैद्यकिन्ही, सौंदाना, सोनेगाव, दासखेड, पाचंग्री, पारगाव घुमरा, किनगाव आदी गावांना भेटी देणार आहेत. गेवराई येथे ईद-ए-मिलाद या कार्यक्रमासही मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत.त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी विविध गावांनी केली आहे.विविध ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत.पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची पेढे तुला करण्यात येणार आहे.सोनेगाव ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पोशाख भेट दिला जाणार आहे. सोनेगाव गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सर्व समाज बांधवांची जेवणाची सोयही करण्यात आलेली आहे.
शिक्षणातील व नोकरीतील आरक्षणासाठी गरजवंत मराठा समाजासाठी मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला लवकरच अंतिम यश मिळणार आहे. क्षेत्र संस्थान नारायणगड ता.जि.बीड येथे 8 जून, 2024 रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारीही सुरू आहे.
Nice 👍👍👍
Nice article
Nice article 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Good 😊😊😊😊 article
Good 👍 article
Good
Good
Great 👍👍👍👍
Nice 👍👍👍👍👍