समता प्रतिष्ठान बीडचे कार्य

समता प्रतिष्ठानने महिला नागरी सहकारी पतसंस्था व समता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवले आहे. बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायांना कर्ज देणे. यातून महिलांनी स्वतंत्र व्यवसाय उभारला. कॉम्रेड त्रिंबक भगवानराव हरगंगे काका यांच्या अध्यक्षतेखाली समता प्रतिष्ठानचे कार्य चालते. त्यांच्या सोबतीला 12 महिला संचालक मंडळ आहे. मार्गदर्शक सल्लागार मंडळ ही कार्यरत आहे. या बचत गटाच्या प्रेरणास्थान पद्मश्री कॉम्रेड प्रेमाताई पुरव या संस्थापक सचिव अन्नपूर्णा महिला मंडळ मुंबईच्या आहेत. समता शक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था बीडच्या संचालक मंडळामध्ये 14 सदस्य कार्यरत आहेत. नुकताच समता शक्ती उद्योजक महिला महामेळावा 2 फेब्रुवारी 2025 रोजी बीड येथे संपन्न झाला होता. त्यानिमित्ताने त्यांनी समता शक्ती उद्योजक महिला विशेष अंक प्रकाशित केलेला होता. या विशेषांकमध्ये 78 महिलांच्या बचत गटांची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये बचत गटाचे नाव बचत गटाच्या महिला प्रमुखाचे नाव गाव व शिक्षण व्यवसाय आधी माहिती देण्यात आली आहे. बचत गट चालवताना त्यांचा संघर्षमय प्रवास त्यांनी स्वतःच्या शब्दांमध्ये यामध्ये वर्णन केलेला आहे.

1 thought on “समता प्रतिष्ठान बीडचे कार्य”

  1. There are certainly a whole lot of details like that to take into consideration. That could be a nice level to bring up. I offer the thoughts above as general inspiration but clearly there are questions like the one you deliver up the place the most important thing might be working in honest good faith. I don?t know if finest practices have emerged round things like that, but I’m positive that your job is clearly identified as a good game. Both girls and boys really feel the impression of just a moment’s pleasure, for the remainder of their lives.

    Reply

Leave a Comment