अशोक आखाडे सर वाढदिवसानिमित्त लेख

आज माझे वर्गमित्र अशोक आखाडे सर यांचा वाढदिवस आहे.आम्ही 1999-2001 गजानन विद्यालय राजुरी न.येथे अकरावी व बारावी college ला एकत्र होतो. आमच्या batch चे अनेक मित्र मैत्रीण आज बीड व महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी नोकरी व काही मित्र उद्योगधंद्यात कार्यरत आहेत. आम्हाला शिकवायला सोंडगे सर,रासकर सर,लाटे सर,सोनवणे सर,सय्यद सर,घोळवे सर होते.

आज जीवन एवढे धावपळीचे झाले आहे की निवांत लिहायलाही वेळ नाही.प्रत्येकाच्या आशा-अपेक्षा वाढल्या आहेत. मोबाईल डिजिटल क्रांतीने व AI ने प्रत्येकजण busy झाला आहे.काळ असा बदलेल असे स्वप्नातही वाटत नव्हते. Facebook व WhatsApp च्या आहारी प्रत्येकजण जवळपास गेला आहे.Mobile चे status, reels story बनवण्याच्या नादात माणुसकी व गावपण हरवत चालले आहे.गावे व शहरे बदलली. नाते, शेती, माती जवळपास सर्वच बदलले आहे.गावातील जुने वाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. पैशाच्या मागे माणूस धाव-धाव धावत पळत सुटला आहे.अनेक चांगली ज्येष्ठ मंडळी मातीआड गेली आहेत. नातीगोती, संबंध यामध्ये स्वार्थ आला आहे.

अशोक आखाडे सर एक शांत, संयमी व हुशार विद्यार्थी म्हणून वर्गात व दोस्तात सर्वात आवडता होता. सध्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे.नवोपक्रमशील ,आदर्श व विद्यार्थीप्रिय अशोक आखाडे सर यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.

राजुरी न.अशोक आखाडे सर यांचे आजोळ आहे.अशोक आखाडे सर यांना दोन सख्खे भाऊ आहेत.आखाडे सर यांचे मुळगाव बीड तालुक्यातील पिंपळगाव मोची आहे.आखाडे सर हे पुरोगामी विचारसरणीचे आहेत. वर्गमित्र अशोक आखाडे सर यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा. सर्वच एका लेखात उल्लेख करणे अशक्य म्हणून क्रमश: चांगले मित्र ही जगातील व आपल्या जीवनातील श्रेष्ठ संपत्ती आहे ती जपा व पुढे वाटचाल सुरु ठेवा. Happy birthday Ashok Aakhade sir once again.Be successful in your life.

1 thought on “अशोक आखाडे सर वाढदिवसानिमित्त लेख”

  1. सचिन …खरंच सुंदर लेख आहे…माझ्या प्रती असलेली मैत्रीची भावना अशीच जीवनभर जपेल…आणि जेंव्हा जेंव्हा भेट होईल..तेव्हा मनसोक्त गप्पा मारू. …पुनःश्च मित्रा तुझे खूप खूप धन्यवाद…🙏

    Reply

Leave a Comment