कांबळेश्वर शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री .रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मुंबई येथील सामाजिक संस्थेमार्फत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १०० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व खाऊच्या पॅकीटचे वाटप करण्यात आले . वाटप कार्यक्रम शाळेमध्ये महाराष्ट्र दिनी च्या दिवशी साजरा करणेत आला निकाला बरोबर मुलांना लेखन साहित्य , पाऊच, बिस्कीट, फ्रुटी, कॅटबरी, वेफर्स आदी साहीत्य मुलांना मिळाल्याने विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला .
शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे, सौ मनिषा चव्हाण या सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते . १००% विद्यार्थी उपस्थिती होती .
मुलांना रजित गुप्ता यांचे कडून मिळालेल्या साहित्याचे वितरण सरपंच सौ मंदाकिनी कानडे , सौ सीमा खलाटे सौ राजश्री आगवणे , श्री किरण आगवणे पालक ग्रामस्थ यांचे उपस्थिति मध्ये वाटप करण्यात आले .
शाळेतील मुलांना वाटप करण्यात आलेल्या साहित्याचे मुंबई येथील संस्थेच्या मार्फत मिळातेबद्दल शाळेतील शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले .

डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत कांबळेश्वर शाळेचे यश –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेने विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला होता . त्यामध्ये प्रामुख्याने मंथन , ऑलिम्पियाड, MTS, Itse अशा विविध परीक्षांत राज्य जिल्हा स्तरावर शाळेचे विद्यार्थी यशस्वी झाले असून डायमंड सर्च परीक्षेत इ. २ री मधील श्रीतेज निलेश चव्हाण आणि इ ४ थी मधील आराध्या विनोद गायकवाड यांनी यश मिळवले .
मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे सौ मनिषा चव्हाण शाळेतील सर्वांनी ग्रामिण भागतील मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,,संधी मिळऊन देण्याचे काम माता पालकांना विश्वासात घेऊन वर्षभर सातत्य राखू न शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला असून १००% मुलांना पालक मात्रणीवरून विविध परीक्षा मधून शाळेतील विद्यार्थी चमकत असून विद्यार्थी पालकांत जिल्हा परिषद शाळेवरील मातृभाषेतील शिक्षणा शिवाय पर्याय नाही ही बाब पालवांच्या गळी उतरवण्यात शिक्षकांना यश आले असून याचाच परिपाक म्हणजे अनेक विद्यार्थी इंग्रजी / खाजगी माध्यमातून शाळेत दाखल होत असून मोफत व दर्जेदार जिल्हा परिषद शिक्षणाचा लाभ पालकांना मिळत आहे . शिक्षणात ‘शिकणे वा अध्ययन’ आणि ‘शिकवणे वा अध्यापन’ या एकमेकांच्या पूरक गोष्टी आहेत . बालक लहान वयात बऱ्याच गोष्टी पाहुन, हाताळून, ऐकुन शिकत असले तरी गुरुशिवाय ज्ञान अधुरे राहु नये म्हणुन त्याला शाळेत घातले जाते लहान वयातच बालकांच्या शिक्षणाचा पाया रचला जात असल्यामुळे मुलांना सहज कळेल, ती मुले न कंटाळता शिकण्याचा आनंद घेतील असे अध्यापन करणे ही शिक्षकांची महत्वाची जबाबदारी व कर्तव्य आहे.
1)लहान मुलांना आपलेसे करणे व त्यांना सहजतेने शिकवणे त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करून आनंदात अभ्यास करायला लावणे याची जबाबदारी शिक्षकावर असते.
2)जेथे मुले शिकतात तेथील वातावरण स्वच्छ, सुरक्षीत व सुशोभित ठेवले तर मुले शिकण्यात रमतात नाहीतर अस्वच्छ कोंदट जागेन कंटाळतात याचीही जाणिव शिक्षकांना असाय‌ला हवी.
3)लहान वयातील मुलांचे सुरवातीचे शिक्षण मातृभाषेतुन केले तर त्यांना शिकवलेले कळणे सोपे जाते याचा आग्रह शिक्षकांनी धरायला हवा, त्याचबरोबर इंग्रजी शिकले तरी चालेल.
4) मुलांना सहज सोप्या शिक्षणातून अवघड शिक्षणाकडे घेऊन जाणे हि शिक्षकांची महत्वाची जबाबदारी आहे.
5)अध्यापन शास्त्राप्रमाणे शिक्षकांनी आपली अध्यापनाची जबाबदारी कमी करत त्यातुन मुलांना स्वयंअध्ययनाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यासाठी शैक्षणिक प्रयोग म्हणून DTSE- Diamond Talent search Examination हा प्रकल्प सामाजिक, शासकिय संस्थांच्या मदतिने राबवला जात आहे. अगदी सोप्या भाषेत मुलांना अभ्यास देऊन त्यांच्या मनातील परिक्षेची भीती काढून टाकणे व मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लावणे हा या शैक्षणिक प्रयोगाचा उद्दे‌श आहे.
शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल पालक ग्रामस्थ यांनी शाळेच्या विविध स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शन करणारे शिक्षक सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

2 thoughts on “कांबळेश्वर शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप”

Leave a comment