पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीमुळे शिक्षकांकडून सन्मानित

बीड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे यांची नुकतीच गडचिरोलीत सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.संजय तुपे हे मुळचे बीड तालुक्यातील मुर्शदपुर गावचे भुमीपुत्र आहेत. 2014 मध्ये महाराष्ट्र दलात त्यांची प्रथम क्रमांकाने पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. मुंबई पोलीस दलातही एकुण 7 वर्षे त्यांनी पुर्ण केली. 2022 साली ते बीड पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत दाखल झाले. 27 महिने त्यांनी बीडच्या गुन्हे शाखेत काम केले. त्यांनी अनेक खुनाचे, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अवैध पिस्टल, चंदन तस्करी, वाळुचोरी, जुगार, दारुबंदी, गुटखा यासंदर्भात धाडसी कारवाया केल्या आहेत.

गडचिरोली या नक्षलप्रभावीत क्षेत्रातही तुपेसाहेब उत्कृष्ट कार्य करतील यात अजिबात शंका नाही.त्यांच्या पदोन्नतीबद्दल व आजपर्यंतच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वतीने त्यांना Hotel निलकमल येथे सत्कारित करण्यात आले. यावेळी नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्रीराम बहीर सर, वडवणी तालुका शिक्षक सहकरी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष शाम मुळे सर, नितीन बागलाने सर, सचिन पिसाळ सर,महादेव घोडके सर,अजित मुळुक सर,सचिन घुमरे सर, राहुल सुपेकर सर, सुस्कर सर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील सेवेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.

Leave a Comment