काल दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकावर केलेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. हा दहशतवादी हल्ला अतिशय भ्याड होता. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांना टार्गेट केले. एकाही महिलेवर त्यांनी गोळी झाडली नाही. भारत देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा हल्ला आहे. उन्हाळा असल्याने पर्यटकांची गर्दी जम्मू कश्मीर श्रीनगर या ठिकाणी झाली होती. याचा विपरीत परिणाम भारताच्या पर्यटनावरही होणार आहे. भारताने कडक पावले उचलून पाकिस्तानवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. 26 11 मुंबई येथील ताज हॉटेलचा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठया स्वरूपातील दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादाला जात धर्म अजिबात नसतो किंवा दहशतवादाला रंग रूप ही नसते. दहशतवाद हा दहशतवादच असतो. तो कोणत्या स्वरूपात येईल सांगता येत नाही. भारताच्या सीमारेषेवरील स्वर्ग म्हणजे जम्मू कश्मीर आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारत देशाच्या पंतप्रधानांनी मोठी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवावा ही भारताच्या सामान्य जनतेकडून अपेक्षा आहे. जम्मू-काश्मीरच्या मुस्लिमांनी मानवतेचे उचललेले पाऊल खरंच कौतुकास्पद आहे.
दहशतवादाचा अंतिम खात्मा करण्यासाठी दहशतवादाची पाळीमुळे उखडाऊन टाकावी लागतील. दहशतवादामुळे निष्पाप बळी पडलेल्या कुटुंबांना शासनाने आधार देणे आवश्यक आहे. पाकिस्तानला सर्वतोपरी मिळणारी मदत भारताने बंद करावी. पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारताने ठेवू नयेत. सीमारेषेवरील सुरक्षा वाढवून तेथे चेकपोस्ट तैनात करण्यात यावेत. 2000 च्या आसपास पर्यटक असताना तिथे सुरक्षा अजिबात नसणे खरंच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात असती तर एवढे निष्पाप बळी गेले नसते. या गोष्टीला जबाबदार कोण?
हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये विविध ठिकाणी घडत आहे ही भारतासाठी चांगली बाब आहे. दहशतवाद हा प्रत्येक ठिकाणी असतो तो जात धर्म अजिबात बघत नसतो. महाराष्ट्रामधील ही काही पर्यटक यामध्ये मारले गेले आहेत. दहशतवाद्यांनाही अशा प्रकारे शिक्षा देऊ मारले पाहिजे तेव्हाच त्यांच्यावर अंकुश बसेल. दहशतवाद कशामुळे फोपावला या कारणांचाही विचार होणे आवश्यक आहे. भारतीय लष्करातील रिक्त जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. या रिक्त जागा आजपर्यंत का भरल्या नाहीत? याचे जबाबदारी ही कुणीतरी स्वीकारली पाहिजे.दहशतवाद हा जगातून कधीच संपणार नाही असेही काहीजण म्हणतात आपणास काय वाटते. दहशतवादाचे छुपे शिक्षणही काही ठिकाणी दिले जाते हे विदारक वास्तव आहे.