जागतिक वसुंधरा दिन

आजच्या काळात मानव धावपळीचे जीवन जगत आहे. हे जीवन जगताना तो पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. पर्यावरणाकडे त्याचे अक्षम्य अशा प्रकारचे दुर्लक्ष होत आहे. बेसुमार वृक्षतोड मानवाच्या हातून होत आहे. यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. कुठेतरी हे थांबले पाहिजे. फक्त वृक्षतोडच नाही तर इतरही कारणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. जागतिक तापमान वाढीला या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. नद्यांमध्ये ही कचरा साचून नद्या या स्वच्छ होत आहेत. प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व मानवाला जागृत करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन हा जगभरात 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. वसुंधरा म्हणजे ही पृथ्वी तिचे जतन व संवर्धन आपण केले पाहिजे. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. मानवतेच्या दृष्टीने वसुंधरा ही माझी आई व तिची काळजी घेणे माझी जबाबदारी आहे असे प्रत्येकाने मानले पाहिजे.

यामध्ये पाण्याची स्वच्छता, झाडे लावा झाडे जगवा,सेंद्रिय शेतीचा अधिकाधिक वापर अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये होत असतो. वसुंधरेचे संरक्षण केले तरच ही मानव जात पुढच्या काळामध्ये टिकून राहील अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे. वेळीच प्रत्येकाने जागे झाले पाहिजे. प्रत्येक शहरांमध्ये सिमेंटची जंगले उभी न राहता झाडेही भरपूर शहरांमध्ये ही लावणे आवश्यक आहे. नद्यांमध्ये कचरा न टाकला पाहिजे. वसुंधरेचे संरक्षण केले तरच पृथ्वीचे तापमान कमी होणार आहे. जागतिक तापमान वाढ ही चिंतेची बाब आहे.

Leave a Comment