चौसाळा :: कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा साहित्यप्रेमी स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असून त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटले जाते. सहकाराच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व त्यांनी महाराष्ट्रात सुरू केले असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलासराव भिलारे यांनी व्यक्त केले तर मराठी विभाग प्रमुख प्रा. सुधीर माने म्हणाले की स्व. यशवंतराव चव्हाण साहित्याचे व्यासंगी होते त्यांनी विपुल लेखन केले. लेखक, कवी, नाटककार अशा साहित्यिकांना त्यांनी उदार राजकीय आश्रय दिला ते समाजकारण राजकारण व साहित्याच्या प्रांतात सुद्धा रमत असत कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉक्टर अमर आलधे प्रा. डॉक्टर संजय कदम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
