गोविंद वायकर सर – ऑनलाइन अपडेटचा शहेनशहा

सरल अपडेट या whatsapp group चे admin नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान लोकप्रिय संचालक , सर्वांना मदतीसाठी तत्पर असणारे, अष्टपैलू विनोदी व दिलखुलास प्रहार शिक्षक संघटनेचे बीड जिल्हा सचिव तथा युवा शिक्षक नेतृत्व आदरणीय गोविंद वायकर सर यांचा आज वाढदिवस आहे. गोविंद अंकुश वायकर सर हे बीड जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांचा जन्म 26जुलै,1988 यादिवशी झाला. वायकर सर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवंडी ता.जि.बीड येथे झाले. वायकर सर हे नवोदय पात्र झाल्याने त्यांचे पाचवी ते दहावीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय गढी येथे झाले. त्यांचे अकरावी व बारावीचे शिक्षण बलभीम कॉलेज बीड येथे झाले. यानंतर वायकर सर यांनी बीएड व एम ए एज्युकेशनचे शिक्षण पूर्ण केले.वायकर सर यांचे डि.एड.चे शिक्षण Doctor S.S.D.ed.Collage कळमनुरी येथे 2009 साली झाले.वायकर सर यांचा विवाह 12 जुन,2015 यादिवशी झाला.त्यांना बबन वायकर व अरुण वायकर असे दोन बंधू आहेत. बबन वाईकर हे सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत तर अरुण वायकर हे बीड कलेक्टर ऑफिसला वित्त विभागात ट्रेझरीमध्ये क्लर्क म्हणून कार्यरत आहेत.वायकर सर यांनी बालपणापासून दिव्यांगावर मात केली आहे. वायकर सर यांना शैक्षणिक सामाजिक कार्याची विशेष आवड आहे.

वायकर सर हे जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.ते सर्व शिक्षकांमध्ये जिवलग व लोकप्रिय संचालक आहेत.2022 मध्ये वायकर सर हे सर्वाधिक मते घेऊन बीड नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी नियुक्त झाले.वायकर सर संपूर्ण बीड जिल्ह्यात डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वायकर सर यांचे नेतृत्व व नेटवर्क आहे. वायकर सर हे शिक्षकांमध्ये तसेच बीड जिल्ह्यामधील विविध क्षेत्रातील अधिकारी वर्गामध्येही लोकप्रिय आहेत. Happy birthday Waikar sir from all Beed z.p.teachers. वायकर सर यांना दिर्घायुष्य लाभो हीच त्यांना त्यांच्या वाढदिवशी सदिच्छा.

1 thought on “गोविंद वायकर सर – ऑनलाइन अपडेटचा शहेनशहा”

Leave a Comment